जिल्हास्तरीय शालेय “बॉक्सिंग” स्पर्धेत नवी मुंबईतील शाळांमधील विद्यार्थ्यांची दमदार मुक्केबाजीचे प्रदर्शन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या सहकार्याने ‘नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 2025-26’ चे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मरीन सेंटर, से-११, वाशी येथील सुसज्ज अशा बॉक्सिंग रिंगवर संपन्न झालेल्या या स्पर्धेचा शुभारंभ क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती श्री. गिरीश कान्हा म्हात्रे यांच्या शुभहस्ते व उपसभापती श्री.राजू (रॉबीन) मढवी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
नवी मुंबई शहरामधील शालेय विद्यार्थी आज विविध खेळामंध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत असून बॉक्सिंग सारख्या आंतरराष्ट्रीय खेळात पालक आपल्या मुलांना पाठवण्यासाठी पुढाकार घेत आहेत ही उत्साहजनक बाब असल्याचे मत क्रीडा समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याबाबत स्पष्टीकरण देताना बॉक्सिंग म्हटले की दुखापत अथवा जीवाला धोका वाटणारा खेळ अशी सर्वसाधारण समजूत असते मात्र यामध्ये २०० हून अधिक शालेय खेळाडू सहभाग घेत आहेत याचाच अर्थ पालकांना आपली मुले-मुली कणखर बनावीत आणि त्यांनी बॉक्सिंगसारख्या आंतरराष्ट्रीय खेळात नावलौकिक मिळवावे असे वाटतेय, त्याबद्दल त्यांनी पालकांचे विशेष कौतुक करीत मुलांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मरीन सेंटर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि अनुषांगिक सुविधा स्पर्धेकरिता महापालिकेस उपलब्ध करून दिल्याबद्दल मरीन सेंटरचे संचालक श्री.देवराज दास यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून १४,१७ व १९ वर्षाआतील मुले व मुली सहभागी झाले होते. या स्पर्धेव्दारे बॉक्सिंगसारख्या ऑलम्पिक स्तरावर खेळल्या जाणा-या खेळातही खेळाडूंचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात, २८ ते ३० किलो वजनी गटात – लकी निशाद – नमुंमपा शाळा क्र. ९३ नेरुळ, ३२ ते ३४ किलो – समर्थ ताटे – तेरणा विद्यालय, नेरुळ, ३४ ते ३६ किलो – शिवरुद्रा इंगुळकर – न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, ३६ ते ३८ किलो – कैवल्य थोरात – न्यू बॉम्बे सिटी स्कूल, घणसोली, ३८ ते ४० किलो – श्रेयस बाबर – टिळक इंटरनॅशनल स्कूल कोपरखैरणे, ४० ते ४२ किलो – संकेत करे – नमुंमपा शाळा क्रमांक ९३ नेरुळ, ४२ ते ४४ किलो – अविनाश प्रसाद – यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यम कोपरखैरणे, ४४ ते ४६ किलो – मीत नाईक – राधिकाबाई मेघे विद्यालय ऐरोली, ४६ ते ४८ किलो – जय समदर – नमुंमपा शाळा क्र.९३ नेरुळ, ४८ ते ५० किलो – अय्यान वास्कर – फा.ॲग्नल स्कूल, वाशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात ४६ किलो खाली – अराफत मुलानी – टिळक इंटरनॅशनल स्कूल घणसोली, ४६ ते ४८ किलो – अथर्व बदापुरे – एन.आर.भगत ज्यु.कॉलेज नेरुळ, ४८ ते ५० किलो – अली खान – तिलक ग्लोबल स्कूल घणसोली, ५० ते ५२ किलो – विघ्नेश पाठक – सधूवासवानी स्कूल सानपाडा, ५२ ते ५४ किलो – शौर्य कुलकर्णी – व्हीपीएम स्कुल ऐरोली, ५४ ते ५७ किलो – वंश पाटील – डीएव्ही स्कुल, ५७ ते ६० किलो – दिनेश बुगाटी – शिरवणे ज्यु.कॉलेज शिरवणे, ६० ते ६३ किलो – याहा नाखवा – तिलक इंटरनॅशनल स्कूल, ६३ ते ६६ किलो – जाहीद सोफी – साईहोली फेथ कोपरखैरणे, ६६ ते ७० किलो – ओमकार ताकवडे – तिलक स्कूल, ७० ते ७५ किलो वरील दुर्वेश गोकर्णकर – सेंट मेरीज स्कुल, ७५ ते ८० किलो – कैसर शेख – सेंट मेरीज स्कुल, ८० किलो वरील – अंश राय – झेनिथ इंटरनॅशनल स्कूल ऐरोली यांनी प्रथम क्रमांक संपादन केला.
१९ वर्षाआतील मुलांच्या गटात ४६ किलो खालील – वेदांत कोरडे – यशवंतराव चव्हाण ज्युनिअर कॉलेज कोपरखैरणे, ४६ ते ४९ किलो – सनी कुशवाह – सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स, ४९ ते ५२ -प्रथमेश सणस – तिलक ज्युनिअर कॉलेज नेरुळ, ५२ ते ५६ किलो – अनिरुद्ध निकम – ज्ञानपुष्प विद्यानिकेतन सीबीडी, ५६ ते ६० किलो – साहिल अब्बास सय्यद – स्टर्लिंग ज्युनिअर कॉलेज नेरुळ, ६९ ते ६४ किलो – प्रियान्शु दुधाने – तिलक ज्युनिअर कॉलेज नेरुळ, ६४ ते ६९ किलो – लॅनिश कुंडीत – एस एस हायस्कूल नेरुळ, ७५ ते ८१ किलो – जोशुआ फलकाव – तिलक ज्युनिअर कॉलेज नेरुळ, ८१ ते ९१ किलो – आर्यन दासगुप्ता – पेस ज्युनिअर कॉलेज नेरुळ, ९१ किलोवरील – मुकूंद के – झेनिथ इंटरनॅशनल स्कूल ऐरोली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
१७ वर्षे आतील मुलींच्या गटात ४२ किलो खाली – आर्या शिंदे – तेरणा आर्किड कोपरखैरणे, ४२ ते ४४ किलो – मनस्वी हांडे – सेंट मेरज वाशी, ४४ ते ४६ किलो -रिया बेहरा – जयपुरीयार संकुल सानपाडा, ४६ ते ४८ किलो – रुशिता धुमाळ – न्यु बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, ४८ ते ५० किलो – हर्षाली भोईर – ज्ञानदीप हायस्कूल करावे नेरुळ, ५० ते ५२ किलो – श्रावणी पाटील – डीएव्ही पब्लिक स्कूल ऐरोली, ५४ ते ५७ किलो – मिहीका लाले – पोद्दार सीबीएसई नेरुळ, ५७ ते ६० किलो – भाव्या वाघमारे – तेरणा आर्किड कोपरखैरणे, ६० ते ६३ किलो – शिवान्या जाधव – हिंदमाता विद्यालय दिघा, ६३ ते ६६ किलो – रिद्धी पावसे – लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल कोपरखैरणे, ७० ते ७५ किलो – वेदिका सत्रे – लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल कोपरखैरणे, ८० किलो वरील – विजबाला ए – तेरणा आर्किड कोपरखैरणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटात ४५ किलो खाली – लक्ष्मी सरोज – तिलक ज्युनिअर कॉलेज नेरुळ, ४५ ते ४८ किलो – प्रितीका गौडर – आर्य गुरुकुल ऐरोली, ५१ ते ५४ किलो – प्राची आनंद – जयपुरीयार स्कूल सानपाडा, ५४ ते ५७ किलो – मनदीप कौर सैनी – वेस्टन कॉलेज ऑफ कॉमर्स सानपाडा, ५७ ते ६० किलो – प्रिया यादव – शिरवणे ज्युनिअर कॉलेज शिरवणे, ६० ते ६४ किलो – निधी चाळके – आयसीएल कॉलेज वाशी, ६९ ते ७५ किलो – श्रध्दा यादव – यशवंतराव चव्हाण ज्युनिअर कॉलेज कोपरखैरणे, ७५ ते ८० किलो – हर्षिनी पांडे – यशवंतराव चव्हाण कॉलेज कोपरखैरणे यांनी प्रथम क्रमांक संपादन केला.
या सर्व खेळाडूंनी स्पर्धेत यश संपादन केले असून पुढील मुंबई विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी ते पात्र ठरलेले आहेत. या स्पर्धांचे आयोजन ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने यशस्वीपणे संपन्न झाले. शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग वाढावा यासाठी विशेषतः महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थीसुद्धा या स्पर्धेत सहभागी व्हावेत याकरिता क्रीडा विभाग उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे व क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव यांचेमार्फत सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहे.
या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूंना पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे व उपसभापती श्री.राजू (रॉबीन) मढवी यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
Share this content:
Post Comment