महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
पनवेल,दि.29 : महापालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत फटाके व पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करण्याच्या दृष्टीने वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे.
आपण वैश्विक वातावरणीय बदलास सामोरे जात आहोत. वातावरणीय बदलाच्या आणि तापमानवाढीच्या अनेक कारणांपैकी हवेचे प्रदूषण हे महत्वाचे कारण आहे. विविध सण ,उत्सव प्रसंगी आपण फोडत असलेल्या फटाक्यांमुळे कार्बन डायऑक्साईड व सल्फरचे तसेच इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढत असून, कार्बन डायऑक्साईड व सल्फरच्या वाढत्या प्रमाणामुळे हवेच्या प्रदूषणाची पातळी वाढत आहे.फटाक्यांमधून उत्सर्जित होणारे विषारी वायू वनस्पती, पक्षी, प्राणी तसेच सर्व मानवी प्रजातीस हानी पोहोचवतात. हवेचे प्रदूषण थांबविण्यासाठी नागरिकांनी स्वतःपासून सुरूवात केली पाहिजे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना आणि जनजागृती उपक्रम उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात आहेत. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये ग्रीन फेस्टिवल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की. ” माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत फटाकेमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक ग्रीन फेस्टिवल सण-उत्सव साजरे करावेत. पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरा करताना नागरिकांनी पुढाकार घेत दिपावली कालावधीमध्ये फटाक्यांच्या वापर शक्यतो टाळावा. केवळ आवाज मुक्त प्रकाश फटाक्यांच्या वापरास प्रोत्साहन द्यावे.
Share this content:
Post Comment